पाक सैन्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: December 28, 2014 02:04 IST2014-12-28T02:04:59+5:302014-12-28T02:04:59+5:30

जम्मू-काश्मीर राज्यात जम्मू व कठुआलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

Armed violations of Pak army | पाक सैन्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाक सैन्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : जम्मू-काश्मीर राज्यात जम्मू व कठुआलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर दिले. गेल्या चार दिवसांत पाकिस्तानी सैनिकांनी चौथ्यांदा शस्त्रसंधी उल्लंघन केले.
अरनिया सब सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील विक्रमन चौकीवर शुक्रवारी रात्री पाक सैनिकांनी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनीही उत्तर दिले. दोन्ही बाजूंनी रात्री दीड वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. कठुआ जिल्ह्यातील हीरानगर सेक्टरमध्ये जबोवाल चौकीवरही पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला.

 

Web Title: Armed violations of Pak army