जुन्या वादातून नालवाडीत सशस्त्र हल्ला
By Admin | Updated: October 28, 2014 23:02 IST2014-10-28T23:02:08+5:302014-10-28T23:02:08+5:30
जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता नालवाडी येथील एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. यात अखिलेश मानकर व त्याच्या बचावाकरिता येणारा विजय खैरकार हे दोघे जखमी झाले.

जुन्या वादातून नालवाडीत सशस्त्र हल्ला
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता नालवाडी येथील एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. यात अखिलेश मानकर व त्याच्या बचावाकरिता येणारा विजय खैरकार हे दोघे जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अखिलेश मानकर याच्या तक्रारीवरून शैलेश येळणे व रवी येळणे या दोघांसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश व रवी येळने या दोघांचा अखिलेशसोबत वाद होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी शैलेश व रवी याने कट रचून अखिलेशला भेटायला बोलावले. यावेळी शैलेश, रवी व अन्य साथीदार दुचाकीवरून शस्त्रास्त्रासह घटनास्थळावर दाखल झाले. हल्लेखोरांनी अखिलेशवर गुप्तीने वार करून त्याला जखमी केले. यावेळी मदतीकरिता धावून आलेल्या विजयवर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. हल्ल्यानंतर सर्व आरोपींनी पळ काढला. जखमींवर उपचार सुरू आहे. तक्रारीवरून शैलेश, रवी व त्याच्या साथीदाराविरूध्द भांदविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(स्थानिक प्रतिनिधी)