शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लेंग्यावरून वाद, मग स्टेजवर बदलली नवरी, लग्नमंडपात नवरदेवाचा थयथयाट, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 14:51 IST

Marriage News: लग्न लागून वरमाळ घालण्याची वेळ आली असतानाच नवरदेवाने वधूशी विवाह करण्यास नकार दिला. वधू बदलल्याचा दावा करत नवरदेवाने मंडपात गोंधळ घातला. अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर...

हल्ली कुठल्या ना कुठल्या कारणावरून लग्न समारंभात वादविवाद होण्याच्या अनेक घटना घडना घडत असतात. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे शुक्रवारी रात्री एका लग्नसोहळ्यात असाच प्रकार घडला. येथे लग्न लागून वरमाळ घालण्याची वेळ आली असतानाच नवरदेवाने वधूशी विवाह करण्यास नकार दिला. वधू बदलल्याचा दावा करत नवरदेवाने मंडपात गोंधळ घातला. अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गायघाट येथून वरातीसह नवरदेव वाजत गाजत धूमनगर येथे पोहोचला होता. वऱ्हाड्यांचं प्रथेप्रमाणे स्वागत झालं. मात्र लग्न लागत असताना ऐनवेळी नववधूला पाहून नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. नवरीच्या गळ्यात माळ घालण्याची वेळ आली असताच वराने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, नवरीचे कुटुंबीय शांत होते. तर नवरदेव वधू बदलण्यात आल्याचा आरोप करत होता. लग्नाचे विधी पार पाडण्यासाठी वधूच्या वेशात तिची बहीण पोहोचली होती. त्यामुळे नेमकं झालं काय, हे उपस्थित पाहुणे मंडळी आणि वऱ्हाड्यांना समजत नव्हतं. ऐनवेळी नवरी कशी काय बदलू शकते, असा प्रश्न त्यांना पडला होता. वाद वाढत असताना वरपक्षाने पोलिसांनाही बोलावून घेतले.   मुझफ्फरपूर येथील गायघाट येथे राहणाऱ्या टुनटुन कुमार याचा विवाह धूमनगर येथील सपना कुमारी हिच्यासोबत ठरला होता. वरातीसह वाजतगाजत नवरदेव विवाहस्थळी आला. मात्र त्याचवेळी वधू सपना हिला लेंगा न आवडल्याने तिने लग्नास उभी राहण्यास नकार दिला. सपना हिला तिच्या आई वडिलांनी खूप समजावले. मात्र ती लग्नासाठी तयार होईना. तिने लग्न करण्यास ठाम नकार दिल्यानंतर तिच्या धाकट्या बहिणीला तयार करून वरमाळ घालण्यासाठी पाठवण्यात आले. ती जेव्हा मंडपात आली तेव्हा टुनटुन याला त्याची होणारी पत्नी बदलल्याचा संशय आला. त्याने लग्नास नकार देत पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटला नाही. अखेरीस पोलिसांनी सर्वांची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली.  अखेरीस ठाण्याचे प्रमुख संजीव कुमार दुबे यांनी सगळ्यांची समजूत काढून पोलीस ठाण्याजवळ असलेल्या संतोषीमाता मंदिरामध्ये टुनटुन आणि सपना यांचं लग्न लावून दिलं. पोलिसांच्या उपस्थितीतच सर्व विधी संपन्न झाले.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार