शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव विमानतळावरून दोन आमदारांमध्ये तू तू- मै मै

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 14:11 IST

बेळगाव : बेळगाव विमानतळाचा मुद्दा बुधवारी बेळगावातील अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरला अनेक आमदारांनी विषय मांडताना बेळगावच्या विमानतळाचा उल्लेख केला. ...

बेळगाव : बेळगाव विमानतळाचा मुद्दा बुधवारी बेळगावातील अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरला अनेक आमदारांनी विषय मांडताना बेळगावच्या विमानतळाचा उल्लेख केला. नामकरण असेल, विकास असेल किंवा विमानसेवा असेल, अशा अनेक मुद्द्यात विमानतळाचा उल्लेख ऐकायला मिळाला. विमानतळाच्या विकासावरून दक्षिण आणि उत्तर आमदारात कलगीतुरा रंगला आणि तू तू-मै मै झाले.

विधासभेत दक्षिण आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या चर्चेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सांबरा विमानतळाचा विस्तार रखडला आहे. धावपट्टीचे काम सुरू होणे आवश्यक आहे. अनिल बेनके आमदार असताना बेळगाव ते सांबरापर्यंत रस्ता रूंदीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला चार किलोमीटर रस्ता रूंदीकरण झाला. पण, उर्वरित चार किलोमीटरचे काम रखडले आहे. त्यामुळे आठ किलोमीटरसाठी 25 मिनिटे लागतात. केंद्र सरकारने विस्तारासाठी निधी मंजूर केला आहे. पण, भूसंपादन झालेले नाही. विमानतळाला आंतरराष्ट्रीय रूप देणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन व्हावे, अशी मागणी केली.

यावर आक्षेप घेत उत्तर आमदारांनी सांबरा विमानतळावर दिवसा आणि रात्रीही विमानतळे उतरत होती. लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. पण, येथील विमानसेवा हुबळीला कोणी नेली, यावरही चर्चा करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष यु. टी. कादर यांच्याकडे केली. त्यामुळे दक्षिण आमदारांनी या विषयात जाणीवपूर्वक राजकारण करू नये, असे सांगितले. त्याला तुम्हीच राजकारण करत आहात, असे उत्तर आमदारांनी प्रत्युत्तर दिले.यावेळी विमानतळ विषयावरून दोन्ही आमदारांत चांगलीच तू तू-मै मै रंगली. दक्षिण आमदारांनी काँग्रेसने 50 वर्षात बेळगावचा विकास केला नाही. संभाजी पाटील महापौर असताना महापालिकेने सरकारकडे 50 लाखांचे कर्ज मागितले होते. पण, तेही देता आले नाहीत. बेळगावच्या विकासासाठी काँग्रेसने एक रुपयाही दिला नाही, असा आरोप केला. यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले.दरम्यान, लहान मुलांसारखे भांडू नका, अशा कानपिचक्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या . दोन्ही आमदारांतील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष यु. टी. कादर यांनी दोघांनाही खडे बोल सुनावले. दोघेही बेळगाव शहराचे आमदार आहात. शाळेतील लहान मुलांसारखे भांडू नका. एकत्र बसून चर्चा करा, असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMLAआमदार