आर्ची-परशात दुरावा
By Admin | Updated: June 19, 2016 00:18 IST2016-06-19T00:18:11+5:302016-06-19T00:18:11+5:30
सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही चाहत्यांना याड लावलं. आजपर्यंत सैराटने बॉक्स ऑफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून १०० कोटींच्या दिशेने याची घोडदौड वेगाने सुरु आहे.

आर्ची-परशात दुरावा
स राट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही चाहत्यांना याड लावलं. आजपर्यंत सैराटने बॉक्स ऑफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून १०० कोटींच्या दिशेने याची घोडदौड वेगाने सुरु आहे. शूटिंगच्या आधी या दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती. मात्र शूटिंगदरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. चित्रपट रिलीज होण्याआधी प्रोमोशनल ॲक्टिव्हिटीमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते.मात्र मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. एकमेकांचे चांगले मित्र असणारे रिंकू आणि आकाश एकमेकांना टाळत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, त्यांच्यातील दुरावाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र दोघेही प्रमोशनल इव्हेंटमध्ये मात्र एकत्र दिसतात.