अपु:या पावसानंतरही साखरेचे उत्पादन वाढणार!
By Admin | Updated: July 12, 2014 01:19 IST2014-07-12T01:19:52+5:302014-07-12T01:19:52+5:30
जुलै उजाडल्यानंतरही देशाच्या काही भागात असलेली मान्सूनची अनुपस्थिती, तसेच अपुरा पाऊस अशी परिस्थिती असली, तरी यावर्षी साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

अपु:या पावसानंतरही साखरेचे उत्पादन वाढणार!
नवी दिल्ली : जुलै उजाडल्यानंतरही देशाच्या काही भागात असलेली मान्सूनची अनुपस्थिती, तसेच अपुरा पाऊस अशी परिस्थिती असली, तरी यावर्षी साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
उसाच्या 2क्14-15 च्या गळीत हंगामात साधारणपणो 2.53 कोटी टन साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा इंडियन शुगर मिल असोसिएशनने (आयएसएमए) व्यक्त केली आहे. ऑक्टोबर 2क्14 पासून उसाचा गळीत हंगाम सुरू होईल. गेल्या वर्षी 2.43 कोटी टन साखरेचे उत्पादन झाले होते.
गेल्या वर्षीचा 75 लाख टनाचा साखरेचा साठा आणि यावर्षी उत्पादनात होणारी वृद्धी लक्षात घेता 2.45 कोटी टन साखरेच्या मागणीची पूर्तता करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही इंडियन शुगर मिल असोसिएशनने स्पष्ट केले आहे; मात्र दुसरीकडे साखरेच्या वाढत्या उत्पादनामुळे तिच्या साठवणुकीची चिंता साखर कारखान्यांना सतावणार आहे. जूनच्या मध्यात प्राप्त झालेल्या उपग्रहाच्या छायाचित्रंनुसार 2क्14-15 मध्ये 52.3 कोटी हेक्टर क्षेत्रवर उसाची लागवड होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही लागवड दोन टक्के कमी आहे. मात्र त्यानंतरही महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये साखरेचा सरासरी उतारा 11.5 टक्के असल्याने साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा उतारा सुमारे 9.5 टक्के आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4जलाशय व धरणांच्या पाण्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकात उसाच्या लागवडीत वाढ झाल्याचे तर उत्तर प्रदेश व तामिळनाडूत लागवड घसरल्याचे ‘आयएसएमए’ने म्हटले आहे. यावर्षी महाराष्ट्रात उसाच्या लागवडीत सुमारे 13 टक्के वाढ ‘आयएसएमए’ने गृहीत धरली आहे.