शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

५० हजार कोटींच्या प्रगत युद्धसाहित्य खरेदीस मंजुरी; लढाऊ विमानांसह क्षेपणास्त्रांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 4:27 AM

चीनच्या कुरापतींनंतर सीमेवर सुखोई व मिग लढाऊ विमाने तसेच अ‍ॅपाचे व चिनूक लडाऊ हेलिकॉप्टर तैनात करून दक्षता वाढविली आहे. शिवाय चीनच्या हवाई क्षमतेस उत्तर देण्यासाठी अत्याधुनिक विमानविरोधी यंत्रणाही तेथे सज्ज करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पूर्व सीमेवर चीनने सुरू केलेल्या कुरापतींना चोख उत्तर देण्याच्या सैन्यदलांच्या क्षमतेस अधिक बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने व प्रभावी क्षेपणस्त्रांसह ५० हजार कोटींच नवे युद्धसाहित्य खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल’ने तिन्ही सैन्यदलांनी सादर केलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यापैकी सर्वात मोठ्या म्हणजे १८, १४८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव हवाई दलासाठी आहे. त्यानुसार ‘एसयू३० एमकेआय’ प्रकारची १२ व ‘मिग-२९’ प्रकारची २१ नवी विमाने खरेदी केली जातील. सध्या ताफ्यात असलेल्या ‘मिग-२१’ प्रकारच्या ५९ विमानांचीही श्रेणीवाढ केली जाईल. नवी ‘मिग-२९’ विमानांची खरेदी व जुन्या विमानांची श्रेणीवाढ रशियाकडून करून घेतली जाईल. त्याला ७,४१८ कोटी रुपये खर्च येईल. नवी ‘एसयू३० एमकेआय’ लढाऊ विमाने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स(एचएएल) या सरकारी कंपनीकडून १०,७३० कोटी रुपयांना गेतली जातील. नव्या लढाऊ विमानांमुळे अधिक स्वाड्र्न तयार करून हवाईदलाची मारकक्षमता अधिक विस्तारेल व बळकट होईल.

याखेरीज आणखी ३८,९०० कोटी रुपये खर्च करून तिन्ही सैन्यदलांसाठी आणखी विविध प्रकारची शस्त्रे व युद्धसामुग्री खरेदी केली जाईल. यात हवाईदल व नौदलासाठी घेतली जाणारी नजरेच्या पट्ट्यापलिकडे अचूक मारा करू शकणारी २४८ ‘अ‍ॅस्ट्रा’ व ‘पिनाका’ क्षेपणास्त्रे विशेष महत्त्वाची आहेत. शिवाय एक हजार किमी पल्ल्याची जमिनीवरून मारा करणारी क्रुझ क्षेपणास्त्रे विकसित करण्यासही संरक्षण संशोधन व विकास संघटनेस (डीआरडीओ) संमती देण्यात आली. नव्या ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांमुळे लष्कराच्या नव्या रेजिमेंट बांधता येतील तर एक हाजर किमी पल्ल्याच्या क्रुझ क्षेपणास्त्रांच्या सज्जतेने नौदल व हवाईदल अधिक बलशाली होईल. ‘अ‍ॅस्ट्रा’ क्षेपणास्त्रे नौदल व हवाईदलास नवे बळ देतील. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव