टेक्सटाईल पार्कच्या जागेबाबत संभ्रम शासनाकडून मंजुरी : भुसावळ की चोपडा

By Admin | Updated: November 1, 2015 20:49 IST2015-11-01T20:49:54+5:302015-11-01T20:49:54+5:30

जळगाव : राज्य शासनाने टेक्सटाईल पार्क जिल्‘ात स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी चोपडा येथे जागा निश्चित केली असताना शासनातर्फे भुसावळ येथील औद्योगिक वसाहत येथे मंजुरीचे जाहीर करण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

Approval by the government about confusion about Textile Park: Bhusaval Ki Chopra | टेक्सटाईल पार्कच्या जागेबाबत संभ्रम शासनाकडून मंजुरी : भुसावळ की चोपडा

टेक्सटाईल पार्कच्या जागेबाबत संभ्रम शासनाकडून मंजुरी : भुसावळ की चोपडा

गाव : राज्य शासनाने टेक्सटाईल पार्क जिल्‘ात स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी चोपडा येथे जागा निश्चित केली असताना शासनातर्फे भुसावळ येथील औद्योगिक वसाहत येथे मंजुरीचे जाहीर करण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
टेक्सटाईल पार्कसाठी भुसावळ औद्योगिक वसाहतमधील जागेचा विचार यापूर्वी झाला होता. उद्योजकांशी चर्चा केली असता ही जागा उद्योजकांनी नाकारली होती. त्यानंतर चोपडा येथे टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा विचार सुरू होता. तसेच चाळीसगाव वसाहतीमध्येही त्यासाठी विचार होऊ शकतो, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

टेक्सटाईल पार्कची शासनातर्फे भुसावळ येथे घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शनिवारी जिल्हा नियोजन सभागृहात देण्यात आली होती. मात्र चोपडा येथील औद्योगिक वसाहतीत देखील हा प्रकल्प शक्य असल्याने उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: Approval by the government about confusion about Textile Park: Bhusaval Ki Chopra