काँग्रेसच्या नियुक्त्या जुन्या पद्धतीनेच
By Admin | Updated: December 10, 2014 23:55 IST2014-12-10T23:55:41+5:302014-12-10T23:55:41+5:30
आपली जुनीच पदाधिका:यांना नामनियुक्त करणो अथवा सर्वसंमतीने पदभार सोपविण्याची व्यवस्था कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या नियुक्त्या जुन्या पद्धतीनेच
राहुल गांधींची योजना थंडबस्त्यात : मोठय़ा फेरबदलाचे संकेत
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
पक्ष संघटनेमध्ये प्रत्येक स्तरावर निवडणूक घेण्याचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फॉम्यरुला खारीज करीत पक्षाने आपली जुनीच पदाधिका:यांना नामनियुक्त करणो अथवा सर्वसंमतीने पदभार सोपविण्याची व्यवस्था कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्चपदस्थ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ विचारविमर्श केल्यानंतर राहुल गांधी यांनीही या निर्णयाला सहमती दिली आहे. येत्या जानेवारीत राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करण्याचीही तयारी करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत आणि 14 जानेवारीनंतर हे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे.
या फेरबदलात अनेक सरचिटणीस बदलले जातील. परंतु कोणत्या सरचिटणीसावर संक्रांत येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उत्तर प्रदेश या सर्वात मोठय़ा राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांना मात्र कायम ठेवले जाणार आहे. काँग्रेसमध्ये निवडणुकीद्वारे पदाधिकारी नेमण्याची सुरुवात राहुल गांधी यांनी केली होती. त्याअंतर्गत फोटो ओळखपत्रद्वारे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात आली. परंतु पैसे देऊन सदस्य बनविण्यात आल्याच्या आणि त्याद्वारे पदाधिकारी बनल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतरही राहुल गांधी यांनी याच प्रक्रियेच्या माध्यमातून कार्य समितीपासून तर ग्राम पंचायतमधील पदेही याच निवडणुकीच्या माध्यमातून भरण्याचा प्रस्ताव दिला होता.
पक्षांत राहुल गांधींच्या या प्रय}ांना विरोध करण्यात आला होता. युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला आणि मोदी व भाजपाचा मुकाबला करण्यासाठी जुन्या जाणत्या नेत्यांना महत्त्व दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली व त्यानंतर निवडणूक प्रक्रिया बदलून सहमतीच्या आधारावरच नियुक्ती करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाल्याचे समजते.
माणिकराव ठाकरेंना हटविले जाण्याची शक्यता
4राष्ट्रीय स्तरावर फेरबदल करण्यासोबतच प्रदेश काँग्रेसमध्येही मोठे फेरबदल करण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हटवून त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाण्याची शक्यता या सूत्रंनी वर्तविली.
4विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, हे येथे उल्लेखनीय.