नव्या राज्यपालांच्या लवकरच नियुक्त्या!

By Admin | Updated: June 25, 2014 02:59 IST2014-06-25T02:59:09+5:302014-06-25T02:59:09+5:30

भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांची या पदांवर वर्णी लागू शकत़े आगामी संसद अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकत़े

The appointment of new governor soon! | नव्या राज्यपालांच्या लवकरच नियुक्त्या!

नव्या राज्यपालांच्या लवकरच नियुक्त्या!

>नवी दिल्ली : आधीच्या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी सरकारने (संपुआ) नियुक्त केलेल्या काही राज्यपालांनी पदांचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांची या पदांवर वर्णी लागू शकत़े आगामी संसद अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकत़े
छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी आपला राजीनामा सादर केला आह़े या संपूर्ण घडामोडीदरम्यान गोव्याचे राज्यपाल बी़ व्ही़ वांचू यांनी आज मंगळवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली़ बैठकीनंतर ते पत्रकारांशी न बोलताच निघून गेल़े हरियाणाचे राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांनीही राजनाथसिंग यांची भेट घेतली.
 राज्यपालपदाचे दावेदार मानले जाणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन हेही गृहमंत्र्यांना भेटायला पोहोचल़े
काही राज्यपालांवर राजीनाम्यासाठी दबावतंत्र वापरल्यानंतर मोदी सरकारकडून नागालँडचे राज्यपाल अश्विनी कुमार आणि पं़ बंगालचे राज्यपाल एम़ क़े नारायणन् यांना पद सोडण्यासाठी सांगण्यात आल्याचे समजत़े अश्विनी कुमारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली असून नारायणन यांनी निर्णयासाठी काही वेळ मागितला असल्याचे कळत़े 
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
- सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य काही संपुआ नियुक्त राज्यपालांनी राजीनाम्याचे संकेत दिले आहेत़ एका सूत्रने सांगितले की, सत्ताधारी पक्षाकडून एका यादीला अंतिम रूप दिले जात आह़े या यादीनंतर राज्यपालांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकत़े दहापेक्षा जास्त राज्यपाल बदलले जाण्याची शक्यताही या सूत्रंनी वर्तवली़

Web Title: The appointment of new governor soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.