मलिकपेठ रेल्वे स्टेशन खूनप्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: July 12, 2015 21:35 IST2015-07-12T21:35:56+5:302015-07-12T21:35:56+5:30

The application for bail was rejected by the accused on the murder of Malikpeth railway station | मलिकपेठ रेल्वे स्टेशन खूनप्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

मलिकपेठ रेल्वे स्टेशन खूनप्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

>सोलापूर : वडवळ (ता़ मोहोळ) येथील नितीन हणमंत व्यवहारे याचा मलिकपेठ रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे लाईनवर मुंडके धडापासून वेगळे करून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला अभिमान उर्फ बाबा सुरवसे व कृष्णा साठे उर्फ टेलर (रा़ मलिकपेठ, ता़ मोहोळ) यांनी जिल्हा सेशन्स कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडी़ सेशन्स जज्ज एस़डी़अग्रवाल यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला़
वडवळ येथील यात्रेतून दोन्ही आरोपींनी एका महिलेमार्फत नितीन व्यवहारे यास बोलावून घेतले व पूर्व वैमनस्यातून नितीनचे मुंडके धडापासून वेगळे केले़ मुंडके व चेहर्‍याचा चेंदामेंदा केला़ जेणेकरून त्याचा मृत्यू अपघाती आहे असे भासवण्यासाठी त्याचे प्रेत व धड रेल्वे लाईनवर टाकून दिले़ मुलाच्या मृत्यूबाबत मयताचे वडील हणमंत व्यवहारे यांनी कुर्डूवाडी रेल्वे पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती़ तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी नितीन याचा निघृर्णपणे खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती़ मूळ फिर्यादी हणमंत व्यवहारे यांच्यातर्फे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते़ आरोपी कृष्णा टेलर याच्या भावाने यापूर्वीदेखील मलिकपेठमध्ये एका निष्पाप इसमाचा खून केल्याचे व सदरचा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपीच्या जामीन अर्जास मूळ फिर्यादीतर्फे विरोध करण्यात आला होता़ न्यायाधीशांनी दोन्ही आरोेपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला़
याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड़ प्रवीण शेंडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड़ जयदीप माने, ॲड़ रियाज शेख यांनी तर आरोपीतर्फे ॲड़ भारत क˜े, ॲड़ कुणाल क˜े यांनी काम पाहिले़

Web Title: The application for bail was rejected by the accused on the murder of Malikpeth railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.