अॅपलचे CEO टीम कूक सिद्धीविनायकाच्या चरणी

By Admin | Updated: May 18, 2016 13:12 IST2016-05-18T13:05:35+5:302016-05-18T13:12:03+5:30

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अॅपलचे सीईओ टीम कूक भारत दौ-यावर आले आहेत.

Apple's CEO Tim Cook's SiddhiVinayak Chair | अॅपलचे CEO टीम कूक सिद्धीविनायकाच्या चरणी

अॅपलचे CEO टीम कूक सिद्धीविनायकाच्या चरणी

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ - टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अॅपलचे सीईओ टीम कूक भारत दौ-यावर आले आहेत. मंगळवारी रात्री ते दिल्लीत दाखल झाले. आज सकाळी मुंबईतील श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौ-याला सुरुवात केली. भारत दौ-यात कूक गुरगाव, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत. 
 
अॅपलच्या नफ्यामध्ये घट झालेली असताना कूक भारत दौ-यावर आले आहेत. अॅपलच्या आयफोन, आयपॅड या लोकप्रिय उत्पादनांच्या विक्रीमध्ये घट झाल्याने अॅपलच्या नफ्यामध्ये घट झाली आहे. ते येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. मागच्यावर्षी मोदींच्या अमेरिका दौ-यामध्ये सप्टेंबर महिन्यात सिलिकॉन व्हॅलीमध्ये ते मोदींना भेटले होते. 
 
मेक इन इंडिया अंतर्गत भारतात अॅपलचा प्रकल्प सुरु करण्याची त्यावेळी चर्चा झाली होती. अॅपलचे अॅप विकसित करण्याचे केंद्र बंगळूरुमध्ये सुरु होणार आहे. 
 

Web Title: Apple's CEO Tim Cook's SiddhiVinayak Chair