तरुण कुढापा मित्र मंडळ देखावा

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30

लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित सजीव आरास

The appearance of the young Kudapa friends circle | तरुण कुढापा मित्र मंडळ देखावा

तरुण कुढापा मित्र मंडळ देखावा

कमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित सजीव आरास
तरुण कुढापा मंडळ : कार्यकारिणी जाहीर
जळगाव : येथील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही सजीव आरास केली जाणार आहे. युगपुरुष लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित सजीव आरास यावर्षी साकारली जाणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते दहिहंडी आणि गणपतीच्या तयारीलादेखील लागले आहे.
पांझरापोळ चौकातील नेताजी सुभाष बोस व्यायाम शाळेच्या सभागृहात मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले अशी यामंडळाची ओळख आहे.
त्यात अध्यक्षपदी प्रल्हाद कृष्णा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष - आतीश सोनवणे, कार्याध्यक्ष - शंभू भावसार, सचिव - राजेंद्र पाटील, सहसचिव - संजय चौधरी, खजिनदार - सचिन चौधरी, आरास प्रमुख - राजेंद्र पाटील, लेझीम प्रमुख पवन शिंपी, ताथु मराठे,कार्यकारिणी सदस्य - नीलेश शिरसाळे, बबलु जंगले, रवींद्र चौधरी, पंकज भावसार, पवन भावसार, हिरा पाटील, रवींद्र माळी, मनोज सपकाळे, अण्णा चौधरी, गणेश पाटील, शैलेश चौधरी.
अशी असेल आरास
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित देखावे यात सादर केले जातील. लोकमान्य टिळकांची भूमिका ज्युनियर नाना पाटेकर अशी ओळख असलेले मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र पाटील हे करणार आहेत. त्यात लोकमान्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सादर केले जाणार आहेत. यात नाट्यात पाच ते सहा कलाकार सहभागी होतील. प्रथम पोवाडा सादर होईल. नेपथ्यात तुरुंग उभारला जाणार आहे.

Web Title: The appearance of the young Kudapa friends circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.