शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:27 IST

देशभरातील सरपंचांना पंतप्रधानांचे व्यक्तिगत पत्र

नवी दिल्ली : अनेक राज्यांच्या ग्रामीण भागांत उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना व्यक्तिगत पत्र लिहून पावसाचे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी प्रत्येक सरपंचाच्या नावे स्वत:च्या स्वाक्षरीने लिहिलेली ही पत्रे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याकडून ती गावोगाव सरपंचांना पोहोचवली जात आहेत.प्रत्येक सरपंचाशी आणि ग्रापंचायत सदस्याशी व्यक्तिगत संवाद साधण्याच्या भाषेत लिहिलेल्या या पत्रात मोदी लिहितात की, आता पावसाळा तोंडावर आला आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्या देशात मुबलक पाऊस पडतो. देवाच्या दयेने पावसाळ्यात मिळणारे हे पाणी, वर्षाच्या नंतरच्या महिन्यांत उपलब्ध व्हावे यासाठी जास्तीत जास्त पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे हरतºहेचे प्रयत्न आणि व्यवस्था आपण सर्वांनी करायला हवी.काय म्हटले आहे पत्रात?सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र सर्वांना वाचून दाखवावे आणि पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करावी. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही सर्वजण शक्य ते सर्व प्रयत्न कराल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावांमध्ये योग्य ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व गावतळी बांधण्याची सूचनाही मोदींनी या पत्रात केली आहे. जलसंधारण योजनांचा आढावा नव्या मोदी सरकारमध्ये हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून ‘जलशक्ती’ हे स्वतंत्रखाते निर्माण करण्यात आले आहे. या मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आंतरराज्य मंत्रीस्तरीय बैठकीत देशाच्या विविध भागांतील पाणीटंचाई व राज्यांकडून राबविल्या जाणाºया जलसंधारण योजना यांचा आढावा घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी