विलंब टाळण्यासाठी ग्रेनाईटप्रकरणी अपील -पन्नीरसेल्वम
By Admin | Updated: November 3, 2014 02:58 IST2014-11-03T02:58:32+5:302014-11-03T02:58:32+5:30
अवैध ग्रेनाईट उत्खननाच्या तपासासाठी आयएएस अधिकारी यू सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त करण्याविरोधात सरकार अपिलात गेल्याची स्पष्टोक्ती तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ़ पन्नीरसेल्वम यांनी रविवारी दिली़

विलंब टाळण्यासाठी ग्रेनाईटप्रकरणी अपील -पन्नीरसेल्वम
चेन्नई : विलंब टाळण्यासाठीच अवैध ग्रेनाईट उत्खननाच्या तपासासाठी आयएएस अधिकारी यू सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त करण्याविरोधात सरकार अपिलात गेल्याची स्पष्टोक्ती तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ़ पन्नीरसेल्वम यांनी रविवारी दिली़
घोटाळ्याचा तपास पूर्ण झाला होता व यात सामील लोकांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली होती़ असे असताना सगायम या प्रकरणाचा तपास हाती घेत असतील तर यापूर्वी सुरू करण्यात आलेली ही प्रक्रिया पुन्हा रखडली असती. त्यामुळे सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त करण्याविरुद्ध सरकारने अपील दाखल केले, असे ते म्हणाले़ मदुराईचे तत्कालीन जिल्हाधिकारी यू सगायम यांनी ग्रेनाईट खनन घोटाळ्याप्रकरणी अहवाल सोपवला होता व यामुळे सरकारी तिजोरीचे १६ हजार कोटींवर नुकसान झाल्याचा दावा केला होता़ ११ सप्टेंबरला मद्रास उच्च न्यायालयाने या घोटाळ्याच्या तपासासाठी सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त केले होते़ (वृत्तसंस्था)