नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:09+5:302015-08-13T23:24:09+5:30

नागपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात १६४ मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने तलावाची दारे आपोआप उघडली. त्यामुळे पिवळ्या नदीच्या काठावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी ओसरले तरी नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, प्रभारी आयुक्त श्याम वर्धने आदींनी केले आहे.

Appeal to beware of citizens | नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

गपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात १६४ मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने तलावाची दारे आपोआप उघडली. त्यामुळे पिवळ्या नदीच्या काठावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी ओसरले तरी नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, प्रभारी आयुक्त श्याम वर्धने आदींनी केले आहे.
पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी गोरेवाडा तलावाला भेट देऊ न परिस्थितीचे अवलोकन केले. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, सहायक आयुक्त प्रकाश उराडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to beware of citizens