केळझर पाणीपुरवठा योजना रद्द करण्यास नगरसेवकांचा नकार सटाणा नपाच्या ठरावाविरुद्ध अपील : योजना पूर्ण करण्यासाठी साकडे
By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:20+5:302015-09-06T23:09:20+5:30
नाशिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन अपील दाखल केले आहे.

केळझर पाणीपुरवठा योजना रद्द करण्यास नगरसेवकांचा नकार सटाणा नपाच्या ठरावाविरुद्ध अपील : योजना पूर्ण करण्यासाठी साकडे
न शिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन अपील दाखल केले आहे. नगरपालिकेच्या १९ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करून त्याऐवजी नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करून त्यास मंजुरी द्यावी, असा ठराव मंजूर केला आहे. त्यास विरोध करून शुक्रवारी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन नगरपालिकेच्या ठरावावर अपील दाखल केले. त्यात म्हटले आहे की, १९९८ साली युती सरकारच्या कार्यकाळात केळझर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरांतर्गत वितरण व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झालेला असून, लवकरच सटाणा शहरापर्यंत पाणी पोहोचेल, अशी परिस्थिती आहे. धरणालगत असलेल्या काही गावांनी या योजनेस विरोध केला असता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील पोलीस बंदोबस्तात योजनेची कामे करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्याने सटाणा नगरपालिकेला पत्र देऊन केळझर पाणीपुरवठा योजनेऐवजी कळवण तालुक्यातील नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करावी, असे सुचविले. मुळात नवीन पूनद प्रकल्पातून नवीन योजना करण्यासाठी धरणाच्या पाण्यावर आरक्षण टाकण्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याचबरोबर नवीन योजनेसाठी लागणारा खर्च कोण करेल, त्याचबरोबर केळझर योजनेसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच दृष्टीपथात असलेले पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्यासाठी करण्यात आलेला ठराव रद्द करण्यात येऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणीही या अपिलात करण्यात आली आहे. या अपिलावर बाळासाहेब सोनवणे, साहेबराव सोनवणे, नलिनी सोनवणे, मनोज सोनवणे, सुशीला रौंदळ, सिंधूबाई सोनवणे, मंदाकिनी सोनवणे, सुमनबाई सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, अनिल कुवर, अश्पाक शेख, रमणलाल छाजेड आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.