शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'कंपन्यांच्या कामात मुद्दाम अडथळा आणतोय भारत', अ‍ॅप बंदीवरून चीन भडकला; आता दिली अशी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:04 IST

यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती.

ठळक मुद्देभारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली.भारताने पुन्हा बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचे क्लोन असलेल्या 47 अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. जवळपास आणखी 200 मोबाईल अ‍ॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे.

नवी दिल्ली -भारतानेचीन विरोधात आर्थिक प्रतिबंध घालण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे चीन अस्वस्त झाल्याचे दिसत आहे. भारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली. यानंतर यांचे क्लोन असलेल्या 47 अ‍ॅप्सवरही बंदी घालण्यात आली. एवढेच नाही, तर जवळपास आणखी 200 मोबाईल अ‍ॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे. या अ‍ॅप्सना कुठल्याही क्षणी भारत बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. यामुळे आता चीनची अस्वस्थता अधिक वाढली आहे.

भारताने घेतलेल्या या भूमिकेवर नवी दिल्ली येथील चिनी दुतावासाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन असल्याचे दुतावासाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व प्रकारची आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी धमकीही दुतावासाने दिली आहे.

यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने  डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या शी रोंग म्हणाल्या, 'भारत सरकारने ज्या पद्धतीने वुई चॅटसह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली, ते चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघण आहे. आम्ही भारतासमोर आमचे म्हणणे ठेवले आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या या निर्णयात सुधारणा करावी, असेही आम्ही म्हटले आहे. याशिवाय, चीन सरकारने आपल्या कंपन्यांना, त्या ज्या देशात काम करत असतील, त्या देशांच्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले आहे, असेही रोंग म्हणाल्या.

चीन आवश्यक ते पाऊल उचलेल - रोंग'चिनी कंपन्यांचे कायदेशीर अधिकार, तसेच चीनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या हितांचे बाजारातील नियमांप्रमाणे संरक्षण करणे, हे भारताचे कर्तव्य आहे. भारत आणि चीन यांच्यातील प्रायोगिक सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे आहे. मात्र, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे नुकसान होते आणि हे भारताच्या हिताचेही नाही,' असे रोंग यांनी म्हटले आहे. तसेच चीन आपल्या कंपन्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेले, असेही रोंग यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अ‍ॅप्सवर बंदी!

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतTik Tok Appटिक-टॉकNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार