शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:43 IST

बेकायदेशीररित्या भारतात राहण्यासाठी ५ बांगलादेशी नागरिकांनी अशी शक्कल लढवली की, सगळेच हैराण झाले. 

अनेक विदेशी लोक भारतात अवैधरीत्या राहत असून, त्यांना शोधून काढण्याची मोहीम सध्या तीव्र झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, देशभरातून असे लोक पिंजून शोधून काढले जात आहेत. अशातच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. भारतात राहण्यासाठी ५ बांगलादेशी नागरिकांनी अशी शक्कल लढवली की, सगळेच हैराण झाले. 

दिल्लीपोलिसांनी १८ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून, यात ५ किन्नरांचा देखील समावेश आहे. भारतात राहण्यासाठी या ५ बांगलादेशी नागरिकांनी चक्क लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून, किन्नर बनून राहण्याचा मार्ग निवडला. केवळ भारतातून पुन्हा बांगलादेशमध्ये जाऊन राहावे लागू नये, यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. इतकंच नाही तर, बांगलादेशात असलेल्या आपल्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी ते बंदी घातलेल्या 'आयएमओ' या अॅपचा वापर करत होते. पोलिसांनी या लोकांकडून ७ फोन जप्त केले आहेत.

अशोक विहार परिसरात पोलिसांची कारवाई

दिल्लीच्या अशोक विहार परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना मोहीम सुरू असतानाच पोलिसांनी या भागात काही बांगलादेशी नागरिक लपून राहत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच एसीपी राजीव, निरीक्षक विपिन, एसआय श्यामबीर आणि टीमच्या इतर सदस्यांना तात्काळ या परिसराला वेढा घालून तब्बल १०० झोपड्या आणि १५० गल्ल्या पिंजून काढल्या. 

संपूर्ण कुटुंब बेकायदेशीररित्या भारतात

या दरम्यान पोलिसांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले. या व्यक्तीने चौकशीच्या सुरुवातीस पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर त्याने आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्याच्या कुटुंबातील इतर लोकांनाही ताब्यात घेण्यात आले. यात ३ लहान मुलांसह १३ लोक बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचे समोर आले.

भारतात राहण्यासाठी केली शस्त्रक्रियायांचा तपासात पोलिसांनी ५ तृतीयपंथींना देखील पकडले. हे लोक रेड लाईट एरिया आणि इतर भागांमध्ये लोकांकडून पैसे मागण्याचे काम करत होते. चौकशी दरम्यान त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आणि ओळख लपवून भारतात राहण्यासाठी काही हार्मोनल उपचार आणि किरकोळ शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBangladeshबांगलादेशPoliceपोलिस