अनवर शेख याला जामीन

By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30

मडगाव : मोतीडोंगोर येथील आझाद कद्रोली यांच्या मालकीची पल्सर मोटरसायकल चोरून व कद्रोली यांना पाच हजार रुपयांची खंडणी व प्रतिमाह दोन हजार रुपये हप्ता देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या अनवर शेख याला मंगळवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. मडगाव पोलिसांनी अनवर शेख याला धमकी व खंडणी मागितल्याबद्दल अटक केली होती.

Anwar Sheikh has been granted bail | अनवर शेख याला जामीन

अनवर शेख याला जामीन

गाव : मोतीडोंगोर येथील आझाद कद्रोली यांच्या मालकीची पल्सर मोटरसायकल चोरून व कद्रोली यांना पाच हजार रुपयांची खंडणी व प्रतिमाह दोन हजार रुपये हप्ता देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या अनवर शेख याला मंगळवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. मडगाव पोलिसांनी अनवर शेख याला धमकी व खंडणी मागितल्याबद्दल अटक केली होती.
अनवर शेख याच्यावर अशाच प्रकारचे आणखीही गुन्हे पोलीस स्थानकावर नोंद झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेख याने आझाद याची दुचाकी चोरून नेली होती. आपली दुचाकी शेख याच्याकडे पाहिल्यावर आझाद यांनी दुचाकी देण्याची मागणी केली असता त्यांना मारण्याची धमकी देऊन दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचे आझाद यांनी तक्रारीत म्हटले होते. मडगाव पोलिसांनी काल अनवर याला रिमांडसाठी न्यायालयात उभा केला असता न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Anwar Sheikh has been granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.