अनुष्का करणार मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार

By Admin | Updated: January 31, 2017 17:48 IST2017-01-31T17:43:26+5:302017-01-31T17:48:57+5:30

अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता अनुष्का स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करणार आहे. लोकप्रियतेच्या निकषावर शहरी विकास मंत्रालयाने अनुष्काची निवड केली आहे.

Anushka will campaign for Modi's Clean India campaign | अनुष्का करणार मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार

अनुष्का करणार मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 31 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माची निवड करण्यात आली आहे. . मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करणारी अनुष्का पहिली महिला आहे. 
 
अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता अनुष्का स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करणार आहे. लोकप्रियतेच्या निकषावर शहरी विकास मंत्रालयाने अनुष्काची निवड केली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांमध्ये स्वच्छतेविषयी अधिकाधिक जनजागृती करण्याची जबाबदारी अनुष्कावर असेल. 
 
चित्रपटांमध्ये अनुष्काने महिलांना प्रेरणा मिळेल अशा भूमिका दमदाररीत्या साकारल्या आहेत. तिच्या या प्रतिमेचा स्वच्छ भारत अभियनाला उपयोग होईल असे सरकारचे मत आहे

Web Title: Anushka will campaign for Modi's Clean India campaign