शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरुन अनुपम खेर पायउतार; डॉ. मनमोहन सिंग यांची स्तुती भोवली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 4:33 AM

लीकडेच ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील चित्रपटाच्या शूटिंगनंतर अनुपम खेर यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते.

पुणे : आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये व्यस्त असल्याने फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाला (एफटीआयआय) वेळ देऊ शकणार नसल्याचे सांगत अनुपम खेर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि एफटीआयआय सोसायटी स्थापनेस झालेला विलंब यामुळे केंद्र सरकारने जाब विचारल्यानेच खेर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. मात्र अलीकडेच ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील चित्रपटाच्या शूटिंगनंतर अनुपम खेर यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ते भाजपा व केंद्र सरकारला खटकले असावे. त्यातूनच खेर यांना राजीनामा द्यावा लागला असावा, अशी जोरदार चर्चा आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने त्यांना मुदतवाढ न देता खेर यांना अध्यक्ष केले. सुरुवातीला त्यांनी जोमाने काम सुरू केले.‘सरप्राइज’ भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचणी सोडविण्याचे आश्वासनही दिले. मात्र, शूटिंगसाठी ते परदेशात निघून गेले आणि काहीच घडले नाही. नियामक मंडळाने एका वर्षात किमान तीन बैठका घेणे गरजेचे असते. मात्र, दीर्घ काळ एकही बैठक झाली नाही. अखेर मंगळवारी मुंबई येथे तातडीने बैठक घेण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे बैठकही झाली. नियामक मंडळ आणि विद्या परिषदेची स्थापना दोन दिवसांपूर्वी झाली. बैठकीला खेर यांच्यासह नवनियुक्त उपाध्यक्ष बी. पी. सिंग, अभिनेत्री दिव्या दत्ता, प्रा. अर्चना राकेश सिंग, संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदी हजर होते. अभिनेते सतीश कौशिक यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या बैठकीचा अजेंडा विद्यार्थीकेंद्रित होता. त्यानंतर काही तासांतच खेर यांनी राजीनामा दिला. संस्थेच्या सोसायटीची स्थापना न झाल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना संस्थेला अडचणी येत होत्या. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्रे पाठविली होती. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी सोसायटीची स्थापना करण्यात आली.

बैठकीत मौन, त्यानंतर राजीनामानाट्यमुंबईत झालेल्या एफटीआयआयच्या बैठकीत अनुपम खेर यांनी राजीनाम्याबाबत मौन बाळगले. मात्र, बैठकीमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना पत्र पाठविले आणि राजीनामा दिल्याचे टिष्ट्वटरवरून जाहीर केले.

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरFTIIएफटीआयआयNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग