शीखविरोधी दंगल; ४४२ जण दोषी
By Admin | Updated: December 24, 2015 00:04 IST2015-12-24T00:04:17+5:302015-12-24T00:04:17+5:30
१९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल दिल्लीच्या विविध न्यायालयांनी ४४२ जणांना दोषी ठरविले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

शीखविरोधी दंगल; ४४२ जण दोषी
नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल दिल्लीच्या विविध न्यायालयांनी ४४२ जणांना दोषी ठरविले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
१९८४ च्या दंगलींबाबत राष्ट्रीय राजधानीत क्षेत्रात दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांसंबंधी प्रकरणांचा नव्याने तपास करण्यासाठी विशेष तपास चमू स्थापन केली आहे. ही प्रकरणे फाईलबंद करण्यात आली होती. एसआयटीकडून नव्या प्रकरणांच्या अहवालाचा अभ्यास केला जाईल. २००६ मध्ये घोषित पुनर्वसन पॅकेजनुसार मृत्यू, दुखापत, घरांचे नुकसान, विमा न काढलेल्यांना मदत देण्यात आली आहे.