नक्षलविरोधी मोहीम : बस्तरमध्ये ११ तुकड्या
By Admin | Updated: December 8, 2014 01:54 IST2014-12-08T01:54:53+5:302014-12-08T01:54:53+5:30
छत्तीसगडच्या बस्तर या सर्वाधिक नक्षलग्रस्त प्रांतात नक्षलविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने तेथे अतिरिक्त ११,००० सुरक्षा जवान तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नक्षलविरोधी मोहीम : बस्तरमध्ये ११ तुकड्या
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बस्तर या सर्वाधिक नक्षलग्रस्त प्रांतात नक्षलविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने तेथे अतिरिक्त ११,००० सुरक्षा जवान तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चार दिवसांपूर्वी याच बस्तर भागात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून १४ सीआरपीएफ जवानांची हत्या केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.
बस्तरमध्ये तैनात केल्या जाणाऱ्या या अतिरिक्त ११ बटालियनमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दहा आणि सीमा सुरक्षा दलाच्या एका बटालियनचा समावेश आहे. या ११ बटालियनच्या तैनातीनंतर बस्तर हा देशात सर्वाधिक केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आलेला एकमेव प्रांत बनणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)