शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ओवेसींच्या सभेत देण्यात आल्या देश विरोधी घोषणा...? पोलीस तपासात समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 17:48 IST

या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे.

एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या जयपूर (Jaipur) दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थानपोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे.

पोलीस तपासात समोर आलं सत्य - जेव्हा पोलिसांनी या व्हिडिओची तपासणी केली, तेव्हा तेथे ओवेसी साहब झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सभेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये आवाज स्पष्ट नसल्याने पाकिस्तानसंदर्भात घोषणा दिल्याचा संभ्रम निर्माण होत होता. काही लोक हे व्हिडिओ चुकीच्या तथ्यांसह व्हायरल करत होते.' अर्थात, पोलिसांच्या वक्तव्यानंतर हा Viral Video खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेक पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई - यासंदर्भात बोलताना डीसीपी मृदूल कच्छावा म्हणाले, हा व्हिडिओ चुकीच्या तथ्यांसह पसरवणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. पत्रकारांसोबत बोलताना, कच्छावा म्हणाले, पोलिसांनी संबंधित दोन्ही व्हिडिओ अत्यंत बारकाईने तपासले आहेत. यात कुठलाही आक्षेपार्ह कंटेंट आढळलेला नाही. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRajasthanराजस्थानPoliceपोलिस