शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदीविरोध हेच ठरले महामेळाव्याचे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:22 IST

कोलकात्यातील महामेळाव्यात भाजपविरोधी पक्षांच्या तब्बल २२ नेत्यांनी मोदी सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी एकमुखाने शनिवारी रणशिंग फुंकल्याने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढणार आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोलकात्यातील महामेळाव्यात भाजपविरोधी पक्षांच्या तब्बल २२ नेत्यांनी मोदी सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी एकमुखाने शनिवारी रणशिंग फुंकल्याने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढणार आहे. मोदी यांच्यानंतर कोण? या मुद्द्यावर सर्वांनीच भाष्य करणे टाळले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र आपल्या भाषणात नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न अत्यंत दुष्कर प्रश्न आहे, असे सांगून, आपण १० महिने का असेना पंतप्रधानपद भूषविले होते, असा वेगळा सूर आळवला.देवेगौडा यांनी एकप्रकारे आपली महत्त्वाकांक्षाच बोलून दाखविली. शरद पवार म्हणाले की, देशाने मोदी यांना पुरेसा वेळ दिला आहे. ते सलग चार वेळा मुख्यमंंत्री राहिले आहेत. आता केंद्राची सत्ता त्यांच्याच हातात आहे. पण आता त्यांच्यामुळेच देश वाचविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आम्हाला काही नको. आता बदल घडविण्याची वेळ आली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की मोदी-शहा यांना घरी पाठविले, तरच देशात अच्छे दिन येतील. अखिलेश यादव आधीच्या दिवसापर्यंत उत्तर प्रदेशाला पंतप्रधानपद मिळाले पाहिजे, असा आग्रह धरीत होते; परंतु त्यांनीही मतभेदाच्या बाबी आज दूर ठेवल्या.>अहंकारी शक्तींचा पराभव करण्याची वेळकाँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेतृत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला. खरगे म्हणाले की, आम्हाला बदल हवा आहे. कोणतेही पद नको. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की राज्यघटनाविरोधी, अहंकारी आणि विघटनकारी शक्तींचा पराभव करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी