दाऊदबाबत संपुआचेही हेच उत्तर होते
By Admin | Updated: May 9, 2015 00:00 IST2015-05-09T00:00:57+5:302015-05-09T00:00:57+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या ठावठिकाण्याबाबत संपुआ सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेले उत्तरच रालोआ सरकारने दिले आहे

दाऊदबाबत संपुआचेही हेच उत्तर होते
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या ठावठिकाण्याबाबत संपुआ सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेले उत्तरच रालोआ सरकारने दिले आहे, असा खुलासा करीत गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शुक्रवारी विरोधकांचा हल्ला बोथट करण्याचा प्रयत्न केला.
दाऊदच्या ठावठिकाण्याबाबत कोणताही संभ्रम नसून सोमवारी त्याबाबत माझी सभागृहात विस्तृत निवेदन देण्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले. दाऊद नेमका कुठे आहे याबाबत माहिती नसल्याचे विधान सरकारने ५ मे २०१५ रोजी केल्यानंतर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल करीत सरकारला धारेवर धरले. ७ मे २०१३ रोजी तत्कालीन संपुआ सरकारनेही हेच उत्तर दिले होते. त्यावेळी आम्ही टीका केली नव्हती. काँग्रेसला अर्थ कळलेला नसल्यामुळे माझी सोमवारी विस्तृत निवेदन देण्याची तयारी आहे, असे ते काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांना शून्य तासाला उत्तर देताना म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)