जीएसटीबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं
By Admin | Updated: July 1, 2017 08:41 IST2017-07-01T04:44:28+5:302017-07-01T08:41:28+5:30
जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, वर्षभराच्या अंमलबजावणीनंतरच जीएसटीचे नेमके मुल्यांकन शक्य आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे.

जीएसटीबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा केली. देशात स्वातंत्र्यानंतर कर प्रणालीत बदल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात संसदेच्या सेंट्रल हॉलमधे मध्यरात्री विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्याचा हा केवळ चौथा प्रसंग होता. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार, विविध पक्षांचे दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, वर्षभराच्या अंमलबजावणीनंतरच जीएसटीचे नेमके मुल्यांकन शक्य आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे. पण अनेकांना जीएसटी नेमकं आहे इथपासून ते याचा काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळेच नेमके असे कोणते बदल घडणार आहेत ज्याचा दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होणार आहे. जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी...
