आनंदीबेन यांचे नाव शर्यतीत अग्रस्थानी

By Admin | Updated: May 21, 2014 04:07 IST2014-05-21T04:07:01+5:302014-05-21T04:07:01+5:30

नरेंद्र मोदी यांच्या निकटस्थ महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांचे नाव गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी अग्रक्रमावर आहे. मोदी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Anshaben's name is in front of the race | आनंदीबेन यांचे नाव शर्यतीत अग्रस्थानी

आनंदीबेन यांचे नाव शर्यतीत अग्रस्थानी

अहमदाबाद : नरेंद्र मोदी यांच्या निकटस्थ महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांचे नाव गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी अग्रक्रमावर आहे. मोदी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड करण्यासाठी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. नव्या मुख्यमंत्री म्हणून ७३ वर्षीय आनंदीबेन पटेल यांचे नाव ९५ टक्के निश्चित असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी म्हटले. मात्र तरीही, मोदींचा वारसदार निवडण्यासाठी बुधवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही, असे भाजपाच्या एका नेत्याने म्हटले. भाजपाचे सरचिटणीस अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले असून त्यांच्यासह नितीन पटेल, सौरभ पटेल आणि सरचिटणीस भिकुभाई दालसानिया हेही शर्यतीत आहेत. गांधीनगरच्या टाऊन हॉलमध्ये होणार्‍या आमदारांच्या बैठकीला मोदी यांच्यासह केंद्रीय निरीक्षक थावरचंद गहलोत आणि राज्य प्रभारी ओम माथूर हे उपस्थित राहतील.

Web Title: Anshaben's name is in front of the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.