आसाराम प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर कोर्टात चाकूहल्ला
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:01+5:302015-02-13T23:11:01+5:30
जोधपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणांची हत्या करण्यात आली , हे येथे उल्लेखनीय.

आसाराम प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर कोर्टात चाकूहल्ला
ज धपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणांची हत्या करण्यात आली , हे येथे उल्लेखनीय.आसाराम बापूच्या आश्रमात सेवादार राहिलेला राहुल सचान हा पोलीस बंदोबस्तात न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. साक्ष दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात तो पोलीस जीपमध्ये बसत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, अशी माहिती फिर्यादी पक्षाचे वकील पी. सी. सोळंकी यांनी दिली. सत्यनारायण असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने राहुलच्या कमरेत चाकू खुपसला. राहुलला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्य नारायणला पोलिसांनी अटक केली.एक महिन्यापूर्वी ११ जानेवारीला उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात आसारामविरुद्धच्या खटल्यातील प्रमुख साक्षीदार अखिल गुप्ता याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गुप्ता हा आसारामचा स्वयंपाकी व खासगी मदतनीस होता. गुप्ताच्या हत्येपूर्वी अमृत प्रजापती या आसारामच्या माजी सेवकाची गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरात येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.सुरतच्या दोन बहिणींनी आसाराम व त्याचा पुत्र नारायण साई या दोघांवर बलात्काराचा आरोप लावला आहे. या प्रकरणात राहुल हा प्रमुख साक्षीदार आहे आणि आसाराम व नारायण साई हे दोघे महिलांना आपल्या आश्रमात आणून त्यांच्यावर कसे लैंगिक अत्याचार करीत होते, हे त्याने न्यायालयात सांगितले आहे. आसाराम बापू ऑगस्ट २०१३ पासून तुरुंगात आहे. (वृत्तसंस्था)