कॉंग्रेसचा आणखी एक दणदणीत विजय, चित्रकूट पोटनिवडणुकीत भाजपचा केला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 15:08 IST2017-11-12T15:08:09+5:302017-11-12T15:08:47+5:30
मध्य प्रदेशमधील चित्रकूट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय खेचून आणत कॉंग्रसने आणखी एका विजयाची नोंद केली.

कॉंग्रेसचा आणखी एक दणदणीत विजय, चित्रकूट पोटनिवडणुकीत भाजपचा केला पराभव
चित्रकूट : मध्य प्रदेशमधील चित्रकूट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय खेचून आणत कॉंग्रसने आणखी एका विजयाची नोंद केली. या पराभवाने मात्र भाजपला दजबर दणका बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा तब्बल 15 हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव करत विजय मिळवला.
चित्रकुट विधानसभेची जागा काँग्रेस आमदार प्रेम सिंह यांच्या निधनाने जागा रिक्त झाली होती. या जागेवरील पोट निवडणुकीत तब्बल 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 9 नोव्हेंबर रोजी जवळपास 65 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अटीतटीच्या या लढतीत भाजप आणि काँग्रेसने प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता. यातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीन दिवस चित्रकूटचा दौरा करून हि लढत प्रतिष्ठेची केली होती. तरीही काँग्रेस उमेदवार नीलांश चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाल त्रिपाठींचा 15 हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.