शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : 10 तासांत दुसरी टार्गेट किलिंग! बडगाममध्ये स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 23:39 IST

Target Killing In Jammu-Kashmir : हा दहशतवादी हल्ला बडगाममधील मगरेपोरा चडूरा भागात झाला. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश,  असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता.

जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्यांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव नाही. आज, बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला. यात 1 मजुराचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला श्रीनगर येथील SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचास सुरू आहेत. हा दहशतवादी हल्ला बडगाममधील मगरेपोरा चडूरा भागात झाला. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश,  असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अथवा काश्मीर बाहेरील हिंदूंवरील हल्ले वाढले आहे. 

गेल्या महिन्यात अशा तीन घटना घडल्या. यामुळे तेथील अल्पसंख्यक चिंतित आहेत. आज (2 जून) दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. विजय कुमार असे मृत मॅनेजरचे नाव आहे. ते मुळचे राजस्थानमधील हनुमानगडचे होते.

1 मे पासून आतापर्यंत 9 'टार्गेट किलिंग' -जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 9 जणांना टार्गेट करण्यात आले आहे. खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवरून विरोधक मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. कुलगाममध्ये एका काश्मिरी पंडित  शिक्षिकेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी दहशतवाद्यांनी दिलखुश आणि विजय कुमार यांची हत्या केली आहे. यापूर्वी 31 मे रोजी जम्मूमध्ये रजनी बाला (36) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगामच्या गोपालपुरा जिल्ह्यातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या.मे महिन्यात दहशतवाद्यांनी 7 टार्गेट किलिंग केल्या. सर्वात आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची हत्या केली. यानंतर 25 मे रोजी कलाकार अमरीन भट्ट यांचीही हत्या करण्यात आली. याशिवाय तीन ऑफ ड्युटी पोलीसांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादHinduहिंदू