शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

रायन इंटरनॅशनलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; पंजाबमध्ये चौथीच्या मुलाला शिक्षकांकडून अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 10:13 IST

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देरायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे. पंजाबमधील जमालपूर इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका चौथीच्या मुलाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील दोन शिक्षकांनी मिळून या मुलाला बेदम मारहाण केली.

नवी दिल्ली-  गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं प्रकरण ताज असतानाचा रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे. पंजाबमधील जमालपूर इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका चौथीच्या मुलाला अमानुष मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील दोन शिक्षकांनी मिळून या मुलाला अमानुष मारहाण केली. काही दिवसांपूर्वी गुरूग्रामधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी तसंच पालक दोघंही चिंतेत आहेत. यासाठी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर पालकांनी आंदोलनही केलं होतं. रायनमधील या घटनेमुळे मुलांच्या शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. 

पण शाळेतमध्ये मुलाला मारहाण केल्याचे आरोप पंजाबच्या रायन इंटरनॅशनल स्कूलने फेटाळून लावले आहेत. मारहाण झालेल्या मुलाला बुधवारी त्याच्या बेशिस्त वागणुकीमुळे एक महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याने शाळेकडून हे पाऊलं उचललं असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे शाळेतील शिक्षकांनी मुलाला बेदम मारल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. शाळेत काही मुलं एकमेकांशी भांडत असल्याने शिक्षकांनी मारहाण केली. शाळेच्या बाजूला असणाऱ्या हाय टेंशन वायर्सबद्दल मी तक्रार केली होती, म्हणूनच माझ्या मुलाला शाळेतील शिक्षकांकडून मारहाण झाली, असा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून पुढचा तपास सुरू झाला आहे. आमच्याकडे तक्रार आली असून या प्रकरणी तात्काळ कारवाई केली जाणार आहे. आम्हाला त्या मुलाचे मेडीकल रिपोर्ट मिळाले असल्याचं जमालपूर पोलिसांनी सांगितलं आहे. 

गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाली विद्यार्थ्याची हत्यागुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षीय मुलगा प्रद्युम्न ठाकूरची गला चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर रायन इंटरनॅशनल स्कूल जास्त चर्चेत आली. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं आहे. 

रायन इंटरनॅशनल ग्रुपच्या तिन्ही विश्वस्तांच्या अटकेला न्यायालयानं दिली स्थगिती हरयाणा उच्च न्यायालयानं रेयान इंटरनॅशनल ग्रुपच्या तीन विश्वस्तांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधला विद्यार्थी प्रद्युम्न हत्ये प्रकरणात या विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठानं पिंटो परिवाराला जामीन मंजूर केला आहे.रायन इंटरनॅशनल शाळेचे संचालक ऑगस्टिन पिंटो, ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यांनी 16 सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी याचिका अर्ज केला होता. 

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूल