Rahul Gandhi in Nepal: नेपाळमधून राहुल गांधींचा आणखी एक फोटो आला; सोबत होती प्रसिद्ध गायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:22 PM2022-05-04T19:22:24+5:302022-05-04T19:22:51+5:30

Rahul Gandhi in Nepal: दोन दिवसांपूर्वी राहुल हे एका महिलेसोबत नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत होते. यावरून ती महिला कोण? नेपाळमधील चिनी राजदूत का? असा दावाही करण्यात आला.

Another photo of Rahul Gandhi came from Nepal; photo with famous singer saraswoti khtri trending | Rahul Gandhi in Nepal: नेपाळमधून राहुल गांधींचा आणखी एक फोटो आला; सोबत होती प्रसिद्ध गायिका

Rahul Gandhi in Nepal: नेपाळमधून राहुल गांधींचा आणखी एक फोटो आला; सोबत होती प्रसिद्ध गायिका

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळ दौरा फारच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल हे एका महिलेसोबत नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत होते. यावरून ती महिला कोण? नेपाळमधील चिनी राजदूत का? असा दावाही करण्यात आला. राहुल ज्या मैत्रिणीच्या लग्नाला नेपाळमध्ये गेलेत ती भारतविरोधी असल्याचा दावाही केला जात आहे. या साऱ्या घडामोडींवर राहुल गांधी यांचा आणखी एक फोटो आला आहे. या फोटोत नेपाळी गायिका दिसत आहे. 

नेपाळी गायिका सरस्वती खत्रीने एक ट्विट केले आहे. यामध्ये राहुल गांधींसाठी तिने गाणी म्हटल्याचा दावा केला आहे. संगीत सर्वांना सोबत आणण्याची ताकद ठेवते. मला काल भारतीय खासदार राहुल गांधी यांच्यासाठी काही गाणी गाण्याची संधी मिळाली. राहुल गांधी हे खूप नम्र आणि साधे वाटले, असे खत्री यांनी म्हटले आहे. 

Rahul Gandhi in Nepal Night Club: राहुल गांधीसोबत पबमधील ती तरुणी कोण? चिनी राजदूत? दाव्याने उडाली खळबळ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर होते. ते नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास हिच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे गेले होते. राहुल गांधी Lord Of The Drinks नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एका तरुणीसोबतचा व्हिडीओ आला आहे. तिच्याशी ते बोलताना दिसत आहेत. ही तरुणी कोण याचा शोध घेण्यास विरोधकांनी सुरुवात केली.  तिच्याशी एक मिळताजुळता फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ती नेपाळमधील चिनी राजदूत असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील अनेक युजरसह भाजपच्या काही नेत्यांनी ही महिला चिनी राजनैतिक अधिकारी हौ यान्की आहे असा दावा केला आहे. याची अनेक ट्विट व्हायरल झाली आहेत. हौ यान्की ही 2018 पासून नेपाळमध्ये चीनची राजदूत म्हणून काम करत आहे.

Web Title: Another photo of Rahul Gandhi came from Nepal; photo with famous singer saraswoti khtri trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.