शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

हिट अँड रन प्रकरणी सलमानच्या अडचणी वाढल्या, सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका

By admin | Updated: May 13, 2016 08:12 IST

हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने जरी सलमानची सुटका केली असली तरी सलमानच्या गाडीची ठोकर बसून जखमी झालेल्या नियामत शेखने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने जरी सलमान खानची मुक्तता केली असली तरी सलमानच्या गाडीची ठोकर बसून जखमी झालेल्या नियामत शेखने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. २००२ साली वांद्र येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील अभिनेता सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले होते, त्यात एकाचा बळी गेला तर इतर जखमी झाले. त्या जखमींपैकीच एक असलेल्या शेखने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करत सलमानच्या सुटकेला आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ठोस पुराव्यांना नजरअंदाज करत हायकोर्टाने सलमानला चुकीच्या पद्धतीने दोषमुक्त केल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. 
 
काय आहे हे प्रकरण :
२८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी त्याला निर्दोष मुक्त केले होते.
 
सलमानवरील आरोप
> सदोष मनुष्यवध  
> भरधाव गाडी चालवणे 
> निष्काळजीपणा 
> गंभीर दुखापत करणे 
> किरकोळ दुखापत करणे