हेरगिरीप्रकरणी आणखी एक कर्मचारी ताब्यात
By Admin | Updated: February 24, 2015 23:24 IST2015-02-24T23:24:44+5:302015-02-24T23:24:44+5:30
तेल मंत्रालयात हेरगिरी करणाऱ्या प्रमुख हेरांना कथितरीत्या बनावट ओळखपत्र बनवण्यात मदत केल्याबद्दल संरक्षण मंत्रालयात काम

हेरगिरीप्रकरणी आणखी एक कर्मचारी ताब्यात
नवी दिल्ली : तेल मंत्रालयात हेरगिरी करणाऱ्या प्रमुख हेरांना कथितरीत्या बनावट ओळखपत्र बनवण्यात मदत केल्याबद्दल संरक्षण मंत्रालयात काम करणाऱ्या एका अस्थायी कर्मचाऱ्यास मंगळवारी अटक करण्यात आली़ वीरेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे़ यासोबतच तेल मंत्रालयातील कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या १३ झाली आहे़ सोमवारी कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रे लीक केल्याबद्दल एका व्यक्तीस अटक केली होती़ शिवाय अन्य सात लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)