शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएमधून अजून एक पक्ष बाहेर पडणार? उपेंद्र कुशवाहा मंत्रिपदाचा राजीनामा देणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 12:20 IST

बिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे कुशवाहा यांनी स्पष्ट केले आहे

नवी दिल्ली - बिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे एनडीएला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षांच्या आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारमधील एनडीएच्या आघाडीत संयुक्त जनता दल पुन्हा एकदा सहभागी झाल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान,  भाजपा, जेडीयू, लोकजनशक्ती पार्टीमध्ये होणाऱ्या जागावाटपात आपल्याला पुरेसे स्थान मिळत नसल्याने कुशवाहा चिंतीत होते. त्यांनी आपली नाराजीही वारंवार व्यक्त केली. मात्र त्यांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही. दरम्यान, आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे कुशवाहा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आपली पुढील भूमिका स्पष्ट करू, असे कुशवाहा यांनी सांगितले. 

दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे आपला राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) हा पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दल या या पक्षाल विलीन करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुशवाहा यांच्या पक्षातील अनेक नेते जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारBJPभाजपा