स्टारसाठी नेमणार दुसरा ऑपरेटर ....जोड आहे...
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:19+5:302015-02-06T22:35:19+5:30

स्टारसाठी नेमणार दुसरा ऑपरेटर ....जोड आहे...
>गडकरींचे निर्देश : बायोडिझेल, इथेनॉलचा पर्यायनागपूर : शहरातील प्रवाशांना चागंली सेवा देण्यात अपयश ठरलेल्या वंश निमय इन्फाप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) च्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून स्टार बससाठी नवीन ऑपरेटर नियुक्त करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.गडकरी यांनी शहरातील विकास प्रकल्पांचा रविभवन येथे आढावा घेतला. महापौर प्रवीण दटके यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, सभापती रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.महापालिका व व्हीएनआयएल यांच्यातील आर्थिक वाद निकाली काढण्यासाठी आर्बिट्रेटर नियुक्त करावा. नवीन करारात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये यासाठी कायदे तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, सोबतच करारात डिझेल सोबतच बायोडिझेल, इथेनॉल व वीज याचा समावेश करावा. नवीन ऑपरेटरची नियुक्ती होईपर्यत याच कंपनीकडे स्टार बसची जबाबदारी कायम ठेवावी असे निर्देश गडकरी यांनी दिले. स्टार बस, पेंच टप्प -४, २४ बाय ७, नागनदी शुद्धीकरण, सिवरेज प्रकल्प, बाजार, क्रीडा संकुल तसेच खासगी सहभागातील सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पाबाबत अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. पेंच टप्पा ४ हा १५ मार्चपर्यत पूर्ण होईल. तसेच ३१ मार्चपर्यंत शहरातील नवीन २० जलकुं भांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती प्रवीण दटके यांनी दिली. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या २४ बाय ७ योजनेंतर्गत घरोघरी मीटर बसविण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रस्तावित तीन सिव्हरेज प्रकल्प अहवालांचा आढावा घेण्यात आला. रखडलेल्या सिमंेट रस्त्यांच्या कामाला तातडीने सुरुवात होणार आहे. यासाठी कंत्राटदाराला अडीच कोटी देण्यात येणार असल्याची माहिती दटके यांनी दिली.(प्रतिनिधी)