गोमांसावरून झारखंडमध्ये आणखी एकाची हत्या
By Admin | Updated: June 30, 2017 02:01 IST2017-06-30T02:01:21+5:302017-06-30T02:01:21+5:30
गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असतानाच झारखंडच्या रामगढ

गोमांसावरून झारखंडमध्ये आणखी एकाची हत्या
रांची : गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असतानाच झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात सुमारे १०० लोकांच्या जनावाने ४५ वर्षांच्या मुस्लीम व्यापाऱ्यास मोटारीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून मारहाण करून ठार केले.
अलिमु्द्दीन उर्फ असगर अली असे या व्यापाऱ्याचे नाव होते. लोक त्याला मारहाण करीत आहेत, त्याची मोटार जळते आहे, रस्त्यावर मांसाचे तुकडे इतस्तत: विखुरले आहेत व रक्तबंबाळ अवस्थेत तो जीव वाचविण्यास पळण्याचा प्रयत्न करत आहे, अशी छायाचित्रे व्हायरल झाल्याने ही घटना उघड झाली. (वृत्तसंस्था)
पोलिसांची मात्र सारवासारव
पोलिसांचा पवित्रा मात्र सारवासारव करण्याचा दिसला. रामगढचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशी प्रकाश म्हणाले की, आम्ही या व्यक्तीला जमावाच्या तावडीतून सोडविले. तेव्हा ते जखमी होते, पण चालू शकत होते. नंतर त्यांचा इस्पितळात मृत्यू झाला. यावरून त्यांना मारहाणीने नव्हे तर मानसिक धक्क्याने मृत्यू आला असावा, असे वाटते!