उरी दहशतवादी हल्ल्यातील अजून एक जवान शहीद

By Admin | Updated: September 30, 2016 09:10 IST2016-09-30T08:58:51+5:302016-09-30T09:10:44+5:30

उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले जवान राजकिशोर सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्यावेळी गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

Another militant in the Uri terrorist attack, Shaheed | उरी दहशतवादी हल्ल्यातील अजून एक जवान शहीद

उरी दहशतवादी हल्ल्यातील अजून एक जवान शहीद

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.30 -  उरी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले जवान राजकिशोर सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्यावेळी गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. राजकिशोर हे बिहारमधील पीपरपांती गावाचे रहिवासी होते. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार या हल्ल्यात एकूण 20 जवान शहीद झाले आहेत. 
 
18 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमधील उरी इथे भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, ठार केलेले दहशतवादी जैश-ए- मोहम्मद या संघटनेचे होते. नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करत त्यांनी हा हल्ला केला होता.   
 
 
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
(सर्जिकल स्ट्राइक आणि लाँच पॅड्स म्हणजे नेमके काय?)
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
 
उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात बुधवारी रात्री भारताद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या (आयबी) सहा जिल्ह्यांमधील दहा किमीच्या परिसरातील गावे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
देशातील सर्व नौदलाच्या हवाई दलाच्या तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, जम्मू व काश्मीर येथील सीमांवरील सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर पंजाबच्या पाक सीमेवरील लोकांनी गावे सोडण्यास सुरुवात केली असून, त्यांची अन्यत्र राहण्याची सोय करण्यात येत आहे. काहींनी मात्र अन्य नातेवाईकांकडे आसरा घेण्याचे ठरवले आहे. 
 
 

Web Title: Another militant in the Uri terrorist attack, Shaheed