शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करा, अन्यथा...; काँग्रेसमध्ये आणखी एक लेटर बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 15:49 IST

कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडा; काँग्रेस नेत्यांचं सोनिया गांधींना पत्रातून आवाहन

लखनऊ: सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या काँग्रेस पक्षामधील घमासान सुरूच आहे. गेल्याच महिन्यात देशभरातल्या काँग्रेसच्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेलं वादळ अद्यापही शांत झालेलं नाही. त्यातच आता सोनिया गांधींनाउत्तर प्रदेशातल्या पक्षाच्या नेत्यांनी पत्र पाठवलं आहे. गेल्या वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या ९ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवलं आहे. कुटुंबांच्या मोहातून बाहेर पडून काम करा. अन्यथा पक्ष केवळ इतिहासाचा भाग होईल, अशी रोखठोक भाषा पत्रात वापरण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाची अवस्था अतिशय वाईट आहे. राज्यात काँग्रेसची अवस्था आतापर्यंत कधीच इतकी दयनीय नव्हती, असंदेखील पत्रात नमूद करण्यात आलं आहे. माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह या नेत्यांची स्वाक्षरी पत्रावर आहे.राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचनाप्रियंका गांधीवर निशाणाउत्तर प्रदेशच्या प्रभारी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर पत्रातून अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे. सोनिया गांधींनी कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करावा. पक्षातील लोकशाहीची परंपरा पुन्हा जिवंत करावी, असं आवाहन पत्रातून करण्यात आलं आहे."राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, आम्हाला अजिबात अडचण नाही; पण..."

प्रदेश काँग्रेसमधील नेतेही लक्ष्यराज्यातील पक्षाच्या प्रभारींकडून तुम्हाला सद्यस्थितीची माहिती दिली जात नाही, अशी शंका वाटते. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जवळपास वर्षभरापासून वेळ मागत आहोत. मात्र आम्हाला वारंनवार भेट नाकारली गेली. आम्ही आमच्यावरील निलंबनाच्या कारवाईविरोधात अपील केलं होतं. आमच्यावरील कारवाई अवैध होती. मात्र आमच्या अपीलवर विचार करण्यासही केंद्रीय समितीला वेळ मिळाला नाही, असं नऊ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश