शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या, जवानाने घातल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 20:15 IST

त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. सुदिप दत्ता भोमिक असं हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव

त्रिपुरा : त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पत्रकाराची हत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. सुदिप दत्ता भोमिक असं हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या (टीएसआर) जवानाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. सुदिप हे बंगाली भाषेचं वृत्तपत्र स्यानदान पत्रिकाचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम करत होते. टीएसआरच्या एका कमांडंटची भेट घेण्यासाठी सुदिप हे राजधानी आगरतळा येथून 20 किमी अंतरावर असलेल्या आरके नगर येथे गेले होते. भेट घेण्यासाठी त्यांनी आगाऊ वेळ देखील घेऊन ठेवली होती. पण तेथे पोहोचल्यावर कमांडंटच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या जवानाबरोबर भौमिक यांचा वाद झाला आणि त्याने सुदिप यांच्यावर गोळी झाडली. नंदू रियांग असं गोळी मारणा-या हवालदाराचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.  यापूर्वी 20 सप्टेंबर रोजी दिन-रात या स्थानिक वृत्त वाहिनीचे पत्रकार शंतनु भौमिक यांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. कम्युनिस्ट आणि आयपीएफटी समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीची घटना कव्हर करण्यासाठी शंतनु तेथे गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाJournalistपत्रकार