शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सोशल मीडियावर आणखी एक जुमला! केरळला 25 कोटींची 'त्यांची' मदत खोटीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 20:10 IST

नवी दिल्ली : केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला असताना सोशल मीडियावर काहींनी अफवांचा महापूर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी तब्बल 25 कोटी रुपयांचा धनादेश केरळमधील पूरग्रस्तांसाठी दिल्याचे वृत्त आणि फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आले होते. हे फोटो दुसऱ्याच एका सरकारी कंपनीने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत सरकारची कंपनी भारत पेट्रोलिअमने हा ...

नवी दिल्ली : केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला असताना सोशल मीडियावर काहींनी अफवांचा महापूर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी तब्बल 25 कोटी रुपयांचा धनादेश केरळमधील पूरग्रस्तांसाठी दिल्याचे वृत्त आणि फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आले होते. हे फोटो दुसऱ्याच एका सरकारी कंपनीने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भारत सरकारची कंपनी भारत पेट्रोलिअमने हा 25 कोटींचा धनादेश केंद्रीय मंत्री अल्फान्स आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे सुपुर्द केला होता. मात्र, काहींनी हा फोटो भाजपच्या खासदारांनी मदत निधी दिल्याचे सांगत सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. 

या फोटोला झूम करून पाहिल्यास धनादेश देणाऱ्याच्या नावामुळे सर्व चित्र स्पष्ट होते. तेथे भारत पेट्रोलिअम लिमिटेड असे नाव ठळकपणे नमुद केलेले आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत अन्न, पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. कोची रिफायनरी, डेपोचे अधिकारी मदत करत आहेत, असे भारत  पेट्रोलिअमने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितले आहे.

खरेतर हा धनादेश  केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पेट्रोलियम कंपन्यांकडून जमवलेल्या निधीतून देण्यात आला आहे. यावेळी भाजपच्या खासदारासह भारत पेट्रोलिअमचा अधिकारीही उपस्थित होता.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरFake Newsफेक न्यूजBJPभाजपाbankबँक