पाचशे-हजारच्या नोटा बदलीसाठी आणखी एक संधी?

By Admin | Updated: January 26, 2017 14:20 IST2017-01-26T14:20:21+5:302017-01-26T14:20:21+5:30

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी आरबीआयकडून आणखी एक संधी देण्यात येऊ शकते.

Another chance for replacing five hundred thousand notes? | पाचशे-हजारच्या नोटा बदलीसाठी आणखी एक संधी?

पाचशे-हजारच्या नोटा बदलीसाठी आणखी एक संधी?

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिली, दि. 26 - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी आरबीआयकडून आणखी एक संधी देण्यात येऊ शकते. सरकारी अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हिंदुस्थान टाईम्सने तसे वृत्त दिले आहे. देशभरातील सर्व बँकामध्ये अत्यल्प रकमेच्या जुन्या नोटा बदलून मिळतील त्याची मुदत कमी अतिशय कमी असणार आहे. दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या जुन्या नोटा असल्यास लोकांना त्या बदलून घेता येतील. मात्र या नोटा आतापर्यंत बदलणे का शक्य झाले नाही, यामागील कारण लोकांना सांगावे लागेल
 
दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणात नोटाबंदीची माहिती दिली होती. त्यानंतर 30 डिंसेबर पर्यंत नोटाबदली करण्याची मुदत आरबीआयमार्फत देण्यात आली होती. 
 

Web Title: Another chance for replacing five hundred thousand notes?