शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 17:42 IST

मोदी सरकार ने या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी, घर अथवा फ्लॅट विकत घेण्यासाठी अथवा बँकांकडून घेतलेले होम लोन परत करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात 80 बेसिस प्वाइंट अर्था 0.8 टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात 1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे महागाईमुळ सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. वाढत्या महागाईपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने गेल्या महिन्यातच महागाई भत्ता वाढवला होता. तर आता, मोदी सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकार ने या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी, घर अथवा फ्लॅट विकत घेण्यासाठी अथवा बँकांकडून घेतलेले होम लोन परत करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात 80 बेसिस प्वाइंट अर्था 0.8 टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात 1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

7.1 टक्के व्याज दराने मिळणार अ‍ॅडव्हान्सगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ऑफिस मेमोरेंडममध्ये अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात कपातीची माहिती देण्यात आली आहे. यानुसार, आता 31 मार्च, 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने अ‍ॅडव्हान्स पैसे मिळू शकतात. यापूर्वी हा दर 7.9 टक्के होता.

25 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅडव्हान्स मिळू शकते - 7 व्या वेतन आयोगाची शिफासर आणि हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (HBA) नियम 2017 नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना, घर बांधण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी दिले जाणारे अ‍ॅडव्हान्स सरळ व्याज दराने दिले जाते. तर बँक चक्रवाढ व्याजाने होम लोन देते. या नियमानुसार, केंद्रीय कर्मचारी आपल्या मुळ पगारानुसार 34 महिन्यांपर्यंत अथवा जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅडव्हन्स घेऊ शकतात. याशिवाय, घराची किंमत अथवा परत फेडीची क्षमता यांपैकी जे कमी असेल तेवढे पैसे अॅडव्हान्सच्या स्वरुपात घेऊ शकतात.

बँकेचे होम लोनही अ‍ॅडव्हान्सने चुकवता येईल - घर बांधण्यासाठी, घर घेण्यासाठी अथवा फ्लॅट घेण्यासाठी बँकेकडून घेतलेले होम लोनही केंद्रीय कर्मचारी अ‍ॅडव्हान्स घेऊन फेडू शकतात. हे अ‍ॅडव्हान्स कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना मिळेल. मात्र, तात्पूरत्या स्वरुपात असलेल्या कर्मचाऱ्यांची नौकरी सल पाच वर्षांची असायला हवी. महत्वाचे म्हणजे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना, त्यांनी ज्या दिवसापासून बँक अथवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून लोन घेतले असेल, त्याच दिवसापासून अ‍ॅडव्हान्स मिळेल. बँक-रीपेमेंटसाठी अ‍ॅडव्हान्स जारी झाल्यानंतर एका महिन्याच्या आत HBA Utilization Certificate जमा करावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीHomeसुंदर गृहनियोजन