शारदा प्रकरणी आणखी एकास अटक

By Admin | Updated: June 2, 2015 00:34 IST2015-06-02T00:34:19+5:302015-06-02T00:34:19+5:30

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अब्जावधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याशी संबंधित विन रिअलकॉन चिटफंड कंपनीच्या संचालकांना सोमवारी पश्चिम बंगालमध्ये अटक केली

Another arrest in the Saradha case | शारदा प्रकरणी आणखी एकास अटक

शारदा प्रकरणी आणखी एकास अटक

नबीन सिन्हा, नवी दिल्ली
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अब्जावधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याशी संबंधित विन रिअलकॉन चिटफंड कंपनीच्या संचालकांना सोमवारी पश्चिम बंगालमध्ये अटक केली. ही कंपनी पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांत कार्यरत होती.
विन रिअलकॉनने शारदा चिटचाच कित्ता गिरवत हजारो लोकांना फसवून एक हजार कोटी रुपयांची माया जमवली. या कंपनीने तब्बल तीन लाख लोकांना लुबाडल्याचा सीबीआयचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांत महितोश गांगुली, पार्थ प्रतिम रॉय, राजू देय, जॉय भौमिक व राजीब देबनाथ यांचा समावेश असून हे सर्वजण विन रिअलकॉनचे संचालक आहेत.
सीबीआयने प्रारंभी केवळ शारदा घोटाळ्याचा तपास सुरू करून हा घोटाळा चार हजार कोटी रुपयांचा असण्याचा अंदाज वर्तविला होता; मात्र तपासातील प्रगतीनंतर हा आकडा १५ हजार कोटींपर्यंत फुगला आहे. ‘जवळपास ५५ लहान-मोठ्या कंपन्या चिटफंड व रिअल इस्टेट फर्म म्हणून काम करीत होत्या. त्यांनी प.बंगाल, ओडिशा, झारखंड व आसाममधील १५ लाखांहून अधिक लोकांना चुना लावला आहे.

 

Web Title: Another arrest in the Saradha case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.