शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 07:37 IST

विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला

रांची - झारखंड येथील चतरा येथे सोमवारी संध्याकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्स दुर्घटनेत डॉक्टर, रुग्णासह सर्व ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून रांचीहून रुग्णाला दिल्ली नेण्यात येत होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते. विमान वाहतूक नियामक डीजीसीएने विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ला रांचीतील अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

३० दिवसांत दुसरा अपघात 

एका महिन्यात २ चार्टर्ड प्लेन अपघातामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. २८ जानेवारीला पुण्यातील बारामती येथे अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ फेब्रुवारीला सोमवारी रांची येथे ही भीषण दुर्घटना घडली. रांचीच्या देवकमल हॉस्पिटलचे सीईओ अनंत सिन्हा म्हणाले की, रुग्णाच्या कुटुंबाने आधुनिक उपचारासाठी रुग्णाला दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. एअर अ‍ॅम्ब्युलन्सने रांची विमानतळावरून संध्याकाळी ७.१० वाजता त्यांनी उड्डाण घेतले. त्यानंतर ७.३४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. या विमानाचा शेवटचा संपर्क कोलकाता एअर कंट्रोलशी झाला होता. विमानाचा रडार संपर्क वाराणसीच्या दक्षिण पूर्वेकडील १०० एनएम अंतरावर तुटला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंटोलनुसार या विमानाने त्यांच्याशी संपर्क केला नव्हता. 

विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला. त्यातच सिमरिया भागात गावकऱ्यांनी एक विमान पडल्याची सूचना पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर विमानाचे अवशेष खासियातु करम तांडच्या घनदाट जंगलात सापडले. लतेहार जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजय कुमार या रुग्णाला घेऊन विमान दिल्लीला निघाले होते. १६ फेब्रुवारीला ६५ टक्के भाजल्याने त्यांच्यावर रांचीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतु आधुनिक उपचारासाठी कुटुंबाने त्यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था झाल्यानंतर सातच्या सुमारास या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण घेतले.

DGCA ने जारी केले निवेदन

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे Beechcraft C90 b विमान VT-AJV हे रांचीहून दिल्लीला एअर अ‍ॅम्ब्युलन्स प्रवास करत होते. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया गावात येथे विमान कोसळले. या विमानात एकूण सात जण होते, ज्यात दोन क्रू मेंबर्स होते. विमानाने संध्याकाळी ७:११ वाजता रांचीहून उड्डाण केले आणि कोलकात्याशी संपर्क साधला. मात्र संध्याकाळी ७:३४ वाजता वाराणसीच्या दक्षिण पूर्वेपासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर विमानाचा कोलकात्याशी संपर्क तुटला. दुर्घटनेची माहिती मिळताच चतरा जिल्हा प्रशासनाने शोध आणि बचाव कार्य हाती घेतले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी AAIB ची एक पथकही पाठवण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranchi Air Ambulance Crash Kills Seven; Second Accident After Baramati

Web Summary : Seven died in Jharkhand air ambulance crash en route to Delhi. It's the second plane accident after Baramati. DGCA ordered investigation.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाairplaneविमान