नाशिकसाठी आणखी ३०० दलघफू. पाणी

By Admin | Updated: February 6, 2016 00:41 IST2016-02-05T23:58:23+5:302016-02-06T00:41:34+5:30

पालकमंत्री : महापालिकेसाठी आरक्षित असलेला सध्याचा पाणीसाठा आणि धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता धरणातून महापालिकेसाठी आणखी ३०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवून देण्यात येत असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्‘ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Another 300 dalfu for Nashik Water | नाशिकसाठी आणखी ३०० दलघफू. पाणी

नाशिकसाठी आणखी ३०० दलघफू. पाणी

पालकमंत्री : महापालिकेसाठी आरक्षित असलेला सध्याचा पाणीसाठा आणि धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता धरणातून महापालिकेसाठी आणखी ३०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवून देण्यात येत असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्‘ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नाशिक जिल्‘ासाठी २१ नोव्हेंबर रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाची बैठक झाली होती. त्यानुसार जिल्‘ातील वेगवेगळ्या जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून आरक्षण करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेला गंगापूर धरणातून २७०० दशलक्ष घनफूट तर दारणा धरणामधील ५०० दशलक्ष घनफूट असे एकूण ३२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. सदर पाणीसाठा केवळ ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आलेली आहे.
महापालिकेसाठी आरक्षित असलेल्या पाण्याचा विचार करून मनपा आयुक्तांनी या संदर्भात पालिकेला आणखी ३०० दलघफू . पाणी वर्ग करून मिळावे, अशी विनंती जलसंपदामंत्र्यांना केली होती. लोकप्रतिनिधींनीदेखील जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन पाण्याचे आरक्षण वाढवून मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी नाशिककरांसाठी ३०० दलघफू. पाणी वाढवून देण्याचे जाहीर केले आहे. महापालिकेकडे दारणा धरणातून ५००, गंगापूर धरणातील २७०० असा ३२०० दलघफू. पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात आता आणखी ३०० दलघफू पाणी मिळणार असल्याने जलसाठा ३५०० दलघफू. होणार आहे; मात्र हे ३०० दलघफू. पाणी कोणत्या जलसाठ्यातून मिळणार याची स्पष्टता करण्यात आलेली नाही.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता निर्माण झालेली पाणीटंचाई गंभीर आहे, याचा विचार करून पालिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जलसंपदामंत्र्यांनी केले आहे.

Web Title: Another 300 dalfu for Nashik Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.