दिल्लीतील २ विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोन
By Admin | Updated: March 17, 2016 15:32 IST2016-03-17T15:31:53+5:302016-03-17T15:32:42+5:30
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आला आहे. दोन्ही विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे.

दिल्लीतील २ विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोन
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आला आहे. दोन्ही विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या या वृत्तामुळे विमानात आणि विमानतळावर घबराट उडाली आहे. बॉम्बशोधक पथक विमानतळावर पोहचले असून विमानात जाऊन तपास घेण्यासाठी सुरवात केली आहे.
नेपाळ एअर लाइनच्या RA 206 आणि एअर इंडियाच्या 075 फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहीती एका फोनद्वारे आली आहे.
विशेष म्हणजे काल एअर इंडियाच्या बँकॉकहून मुंबईला निघणाऱ्या AI322 या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहीती देण्यासाठी आलेला आणि आजचा फोन कॉलर सेम आहे.