नगर पंचायतचे आरक्षण जाहीर
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30
नगर पंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर

नगर पंचायतचे आरक्षण जाहीर
न र पंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीरप्रत्येकी १७ जागांसाठी होणार लढत : हिंगणा, भिवापूर व कुही येथे मोर्चेबांधणीला सुरुवात नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, भिवापूर व कुही या तीन ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा प्रदान करण्यात आला असून, तेथील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागांचे आराक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होणार असून, या नगर पंचायतींची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हिंगणा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार राजू रणवीर यांच्या उपस्थितीत हिंगणा नगर पंचायतच्या निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. ही निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार आहे. वॉर्ड क्रमांक - १ हा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्यात आला असून, वॉर्ड क्रमांक - २, वॉर्ड क्रमांक - ३ व वॉर्ड क्रमांक - ४ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक - ५ इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिला, वॉर्ड क्रमांक - ६ अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्रमांक - ७ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक - ८ ओबीसी महिला, वॉर्ड क्रमांक - ९ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक - १० ओबीसी महिला, वॉर्ड क्रमांक - ११ इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), वॉर्ड क्रमांक - १२ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक - १३ इतर मागास प्रवर्ग, वॉर्ड क्रमांक - १४ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक - १५ अनुसूचित जाती आणि वॉर्ड क्रमांक - १६ व वॉर्ड क्रमांक - १७ सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत.